Advertisement

२७ फेब्रुवारी : मराठी राजभाषा दिन

२७ फेब्रुवारी म्हणजेच मराठी राजभाषा दिन !

मराठी राजभाषा दिन

कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवसाला हा दिवस संपूर्ण जगात साजरा करण्यात येतो. कवी कुसुमाग्रज यांचे मूळ नाव विष्णु वामन शिरवाडकर होय, ते मराठी भाषेचे ज्येष्ठ साहित्यिक होते. प्रतिष्ठित अशा ज्ञानपीठ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. वि. वा. शिरवाडकर यांचे मराठी साहित्यातील योगदान अतुलनीय असून भविष्यात तरुणांनी मराठी भाषेचा वारसा अखंडित चालवावा म्हणून मराठी राजभाषा दिवस  साजरा करण्याची प्रथा सुरू झाली.

कवी कुसुमाग्रज

कवी कुसुमाग्रज

२७ फेब्रुवारी १९१२ रोजी जन्मलेल्या वि. वा. शिरवाडकरांना लहानपणापासूनच लिहण्याची आवड होती. लहान वय असतानाच त्यांनी काव्य लिहण्यास सुरुवात केली. त्यांना नटसम्राट या अजरामर नाटकासाठी १९७४ साली 'साहित्य अकादमीचा पुरस्कार' मिळाला. नाटक, कथा, कादंबरी अशी त्यांची वाड्यमयातील साहित्य चांगलीच गाजत होती. या योगदानाबद्दल साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च असा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना मिळाला. भारत सरकारने १९९१ मध्ये ‘पद्मभूषण’ पुरस्काराने त्यांचा गौरव केला. 

मराठी भाषा संवर्धन

दुर्दैवाने आधुनिक युगातल्या महाराष्ट्रात मराठी पेक्षा लोक इंग्रजी भाषेला प्राधान्य देताना दिसतात. या साठी खूप गोष्टी कारणीभूत ठरतात. त्यातील च महत्त्वाचे कारण म्हणजे काही लोकांना इंग्रजी हे मोठ्या लोकांचं लक्षण आणि मराठी फक्त गावापुरती मर्यादित आहे असं वाटू लागलं आहे. म्हणूनच कि काय, लहान वयातच मुलांना इंग्रजी शाळेत टाकून पालक त्यांच्या मराठी प्रेमाचं चांगलंच उदाहरण देत आहेत. हल्लीच्या जगात कॉन्व्हेंट शाळेत टाकलय असं म्हणलं कि लोकांना खूप उच्चभ्रू असल्यासारखं वाटतं. मराठी शाळा लोकांनी आता फक्त नावापूरत्या ठेवल्या आहेत, याचीच खंत वाटते. मराठीकडे बघण्याचा दृष्टीकोन संकुचित झालेला दिसतो. 

इंग्रजी कडे वाढता कल

बर लहान असताना टाकतो आम्ही मुलांना मराठी शाळेत, पण उच्च शिक्षण तर इंग्रजी मध्ये आहे. मग तेव्हा आमच्या मुलांनी रडत बसावं का? असा प्रश्न लोकांच्या मनात येतो. मराठी मध्ये शिकला आणि उद्या उठून या स्पर्धेच्या विश्वात आमचा मुलगा किंवा मुलगी मागे राहिले तर? अशी चिंता पालकांना भेडसावत आहे. 

व्यवसायात मराठी नको? 

सगळं शिक्षण झालं की मुलं-मुली नौकरीच्या मागे धावतात. नौकरी म्हणलं कि आधी मुलाखत आली, मुलाखत म्हणजे तोच तुमचा इंटरव्हिउ बर का ! त्या मध्ये मराठी किंवा मातृभाषेचा एक उच्चार जरी काढला कि लगेच समोरून उत्तर येत, का हो किती दिवस मराठी बोलणार? काम करायचं म्हणजे इंग्रजी यायला हवीच. मग काय, पूर्ण दिवस तीच परप्रांतीय भाषा खोट्या दिखाव्यासाठी बोलत राहायची. पण कधीच कोणाला वाटत नाही की जर संपूर्ण व्यवस्था मराठी मध्ये केली तरच मराठी भाषेचा निभावं लागेल. 

व्यवसायात मराठी नको

इंग्रजी ही काळाची गरज आहे, हे मान्य आहे. पण त्यासाठी मायबोलीवर हा अन्याय कशासाठी? तिचा मान जपणं हे आपलं कर्तव्य आहे. लहान मुलं हे आपलं अनुकरण करत असतात, म्हणून च मराठी भाषेचा अभिमान बाळगा. लहान मुलांना इंग्रजी सोबत मराठी ही लिहिता वाचता आली पाहिजे. 

विचार करा

आज जर आपण आपल्या मायबोली ला दुय्यम वागणूक दिली, तर उद्याची पिढी आपल्याला कधीच माफ करनार नाही. परिस्थितीनुसार कसं वागावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण उच्चभ्रू म्हणवून घेणाऱ्या काही मराठी लोकांच्या मुलांना उच्च शिक्षण घेऊन हि मराठी कळत नाही याची एक मराठी माणूस म्हणून लाज वाटते. एकदा एका मुलाची मुलाखती मध्ये निवड झाली. काम करत असताना मराठी मध्ये बोललं म्हणून एक वरिष्ठ व्यवस्थापक एका २२ वर्षाच्या मुलाला इंग्रजी येत नाही तर नौकरी सोडून द्या असं बोलला. त्या क्षणी त्या मुलाने ती नामांकित कंपनी कोणताही विचार न करता सोडली. गर्व वाटतो अशा लोकांचा जे इतके स्वाभिमानी वागतात. कार्यक्रमाची रूपरेषा इंग्रजी असतानाही मराठी मध्ये भाषण देणारा, आज तोच तरुण त्याचे विचार इंग्रजी मध्ये बेदरकार पणे लिहतो, त्यामुळे जे मराठी बोलतात, त्यांना कधीही कमी समजू नका. 

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी।
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी।
धर्म, पंथ,जात एक जाणतो मराठी।
एवढ्या जगात माय मानतो मराठी।

धन्यवाद !!!

Post a Comment

0 Comments