| बापमाणूस |
बापमाणूस
आई ला सगळं मागतो पण बापाला बोलायला घाबरतो,
वरुन दिसला कठोर तरी आतून तो हळवा असतो |
डोक्यावर असलेल्या कर्जाने ते खचले,
तरी बाळाच्या शिक्षणाचे नवीन मनोरे त्यांनी रचले |
माझ्या बाळाला काही कमी पडू नये म्हणून जे रात्रीचा दिवस करतात,
तेच तुझ्या यशाचे गोडवे अभिमानाने सगळ्यांना सांगतात |
लहानपणी ज्या हाथांनी भरवले तुला करंजी लाडू,
नको रे बाळा त्यांना म्हातारपनी घराबाहेर काढू |
ज्यांनी तुला एवढं आयुष्य दिलंय, त्यांचा शब्द तू कधी नको मोडू,
लहानपणी धरलेला हा बापाचा हाथ शेवटच्या श्वासापर्यंत नको सोडू |
शिकलास जरी चार पुस्तकं, जाऊ नको बापाला सोडून परदेशाला,
ज्यांनी लहानाचं मोठं केलं त्यांच्या समोर नाही रे किंमत तुझ्या पैशाला |
आयुष्यभर देह झिझवतो तो तुझ्यासाठी चंदनाचा,
जाण ठेव बाळा विसर पडू देऊ नको त्या कष्टाचा |
बापाचा त्याग तुला नसेल दिसत तर आठव तो घासातला घास,
तुझी भूक भागविली पण उपाशी मात्र त्याला त्रास |
जगातील कोणीही नाही तुला बनू नको कुठे लाचार,
फक्त बापाचा हाथ धर तोच तुझा खंबीर आधार |
सगळे म्हणायचे जळी स्थळी काष्टी पाषाणी आहे आपला देव,
पण माझ्या साठी देव म्हणजे फक्त माझे वडील नामदेव |
कवी/लेखक : सुजित नामदेव तांबे
0 Comments