Advertisement

विकासरत्न प्रा.डॉ. तानाजीराव सावंत

भुम-परंडा-वाशीला आता नाही कशाचीच भीती र...

होती चिखलात रुतलेली विकासाची गाडी

झाली होती समद्या पिकांची नासाडी

काय करावं कळेना शेतकरी राजाला

तेव्हा दिला मिळवून भाव शेती मालाला

भुम-परंडा-वाशीला आता नाही कशाचीच भीती र...

सावंत साहेबांच्या हातून वाढतीय विकासाचीच गति र...

होती सगळीकडे पाण्याची कमी

गावातली पोरं लागली होती खेळायला रम्मी

तेव्हा पोरं लावली सगळी कामाला

अन् केली सुरुवात जनतेच्या विकासाला

भुम-परंडा-वाशीला आता नाही कशाचीच भीती र...

सावंत साहेबांच्या हातून वाढतीय विकासाचीच गति र...

भक्त भेटाया जाई जेव्हा पांडुरंगाला

दिंडीत तेव्हा इलाज नव्हता आजाराला

सुजित म्हणतो हो मिटली बघा चिंता आता सारी

केली चालू आरोग्याची वारी पंढरीच्या दारी

भुम-परंडा-वाशीला आता नाही कशाचीच भीती र...

सावंत साहेबांच्या हातून वाढतीय विकासाचीच गति र...

विकास इतका होता की विरोधकांची झाली भ्रांती

न थांबता न थकता साहेबांनी केली शिवजलक्रांती

असा लाभलाय नेता आपल्याला आरोग्यमंत्री तानाजी

कास धरुया हिंदुत्वाची, आन आहे रे धर्मवीरांची

भुम-परंडा-वाशीला आता नाही कशाचीच भीती र...

सावंत साहेबांच्या हातून वाढतीय विकासाचीच गति र...

कवी: सुजित नामदेव तांबे (लेखक, व्याख्याते)

चिंचपूर ढगे ता.भूम जि.धाराशिव

Post a Comment

0 Comments