Advertisement

निसर्गा थांब जरा......


आभाळ फाटून कोसळलं, 

शिवार सगळं वाहून गेलं,

कांदा, सोयाबीन, द्राक्षांच्या बागा, 

पाण्याच्या लाटेत गडप झाल्या.


गोठ्यातली जनावरं ही वाहून गेली, 

शेतकरी राजा नि:शब्द होऊन रडू लागला,

घामानं पिकवलेलं शेतामधल सोनं, 

क्षणात मातीस मिळून गेलं.


निसर्गा, ऐक ही वेदना, 

आम्हा गरीब शेतकरी मनाची कथा,

थेंब थेंब जपलेली आशा, 

एका लाटेनं नेली बुडवून सगळी स्वप्नं.


शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू नको, 

त्याच्या शिवारात फुलू दे हिरवा श्वास,

निसर्गा, तुझ्या कृपेच्या स्पर्शानं, 

सर्व काही पुन्हा उभं राहील हाच एक विश्वास


अरे पावसा, थांब आता,

अन्नदाता जगवशील, की रडवशील?

Post a Comment

0 Comments