Advertisement

मराठा आरक्षण



आई रोज सकाळी लेकराला उठवते, "शिक ग बाळा, तुझं भविष्य उजळेल" म्हणते,

हातात कष्ट, डोळ्यात स्वप्नं घेऊन, आईच्या मनात मात्र काळजी उसळते.


शेतीवरचा आधार कधीच हरवला, कर्जाच्या ओझ्याने संसार दडपला,

शिक्षण हाच एकमेव आधार दिसे, पण नोकरीच्या रांगेत पोरगा हरवला.


बाप दोन वेळच्या भाकरीसाठी धडपडतो, पण पोराच्या स्वप्नासाठी कर्जही उचलतो,

आईच्या डोळ्यात आशेची ज्योत पेटलेली, आणि बापाच्या कपाळावर चिंता कोरलेली.


लेक शिकतो, पदवी घेतो, नोकरीच्या दारात मात्र हताश होतो,

"बाबा, आरक्षण असतं तर आपणही उभे राहिलो असतो" हे ऐकून हृदयाला टोचतं, डोळं भरून येतं.


"आई, पदवी मिळाली, पण नोकरी कुठे?" हा प्रश्न या हृदयाला छळतो

आई बापाकडे याच्यासाठी आरक्षणाशिवाय काही दुसरा मार्ग नसतो


आरक्षण मागतो आम्ही भीक म्हणून नाही, समानतेची लढाई आहे, न्याय हवा फक्त आम्हाला,

इतिहास आमचा सोनेरी, वर्तमान का काळं? याच प्रश्नानं मन रोज छळतं बापाला.


देवा, माझ्या लेकाचा चेहरा उजळव, त्याच्या हाताला पेनासोबत ताकद दे,

मराठा आरक्षण आमचा हक्क आहे, माझ्या लेकरांच्या मागणीला यश दे .


इतिहास आमचा छत्रपतींचा, शौर्याचा, पण वर्तमान आमचं बेरोजगारीच्या ओझ्याचा,

"आरक्षण नसल्यामुळे तू मागे पडतोस" हे ऐकून मनाला जखमा होतात वारंवार.


मित्र पुढं जातो, मी का मागेच थांबतो, डोळ्यातलं भविष्य धूसर दिसतं,

कष्ट कमी नाहीत, परिश्रम प्रचंड आहेत, पण संधीच मिळत नाही, हाच मोठा अडथळा आहे.


आरक्षण मागतो आम्ही ते दया म्हणून नाही, शिक्षणात, नोकरीत समानता हवी फक्त,

माझं आयुष्य घडावं, आई-बापाचा मान वाढावा, 

हीच सुजित या मराठा तरुणाची कवितेतून हाक आहे.

Post a Comment

0 Comments