पूर आला अचानक, सगळं वाहून गेलं,
गावात दु:खाचं ढग दाटून आलं.
घरं कोसळली, जनावरं वाहून गेली,
लोकांच्या डोळ्यात पाणी, पण आशा कुणी दिली?
पाऊस कोसळला खूप, गावं गेली होती पाण्यात,
शेतातलं सोनं वाहून गेलं, दु:ख दाटलं होत मनात.
त्या वेळी कुणीतरी धावत आलं, ओल्या चिखलातून,
डॉ. तानाजीराव सावंत साहेब नावाचं झाड उभं राहिलं जनतेच्या सावलीतून
कोणाच्या घरात अन्न नव्हतं, तर कुणाच्या जनावरांना चारा नाही,
पण त्यांनी स्वतःच्या हाताने दिलं, कोणाला कमी केलं नाही.
ना दिखावा, ना भाषणं, फक्त काम आणि साथ,
त्यांच्या कृतीत दिसला देव, आणि माणुसकीचा हात.
शेतकऱ्याच्या शिवारात पेरला आशेचा नवा अंकुर,
विद्यार्थ्यांच्या डोळ्यांमध्ये घातला ज्ञानाचा झरा भरपूर.
विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत स्वप्नं, उज्ज्वल भविष्याची वाट,
ज्ञान, मार्गदर्शन, संधी देत त्यांच्यामुळे खुलतो शिक्षणाचा घाट.
शेतकऱ्याच्या घामात सामर्थ्य पाहे,
तरुणांच्या स्वप्नांना दिशा देत राहे,
भूमी पुत्र, भुम-परंडा-वाशीचा खरा अभिमान,
डॉ. तानाजी सावंत साहेब या नावातच दडलेली आहे जनतेची शान.
आज लोक म्हणतात अभिमानानं,
“अडचणीत साहेब उभे राहिले म्हणून आम्ही उभे राहिलो.”

0 Comments