Advertisement

आईसाहेब



कपाळावरचा कष्टाचा घाम जेव्हा

तुझ्या हास्यात विरून जातो

तेव्हा कळतं...तूच एक माझी प्रार्थना आहेस आई


तू रडली तरी वाटतं पाऊस पडतोय आकाशातून,

तू हसली की सूर्य उगवतो माझ्या प्रत्येक आयुष्याच्या पानातून.

तुझ्या ओंजळीत घेतलेला प्रत्येक क्षण,

हा काळ कोणी विकत घेऊ शकत नाही पैशानं.


महादेवाच्या चरणी जशी तू अर्पण केली ही देहरूपी सावली,

तशीच माझ्या मनात तुझी मूर्ती जणू तूच माझी माऊली.

आई म्हणजे शक्ती, आई म्हणजे प्रकाश,

आई तूच माझ्या श्रद्धेचा अखेरचा श्वास.


कठोर होतीस, पण त्या कठोरतेत माया होती,

रागामागे दडलेली तुझी प्रेमळ काळजी होती.

तू पाठीशी होतीस म्हणून आज मी यशस्वी आहे,

यशाचं प्रत्येक पान तुझ्या आशीर्वादाच दान आहे.


तू हातावर ठेवलेली थंडी जणू आणि आकाशाचं ममत्व,

तुझ्या नजरेत असते देवाच्या हृदयाची उब.

कष्टांच्या वाटेवर चाललो मी तुझा हात धरुनी,

थकलेली तू, पण हसलीस, माझी दुनिया उभी करुनी.


कधी कठोर दगडासारखी, कधी मऊ फुलपाखरासारखी,

तू नसली की सगळी लेकरे होतात पारखी.

तुझ्या डोळ्यांतून वाहते, एक नदीच जणू प्रेमाची,

दाखवून देतेस वाट त्या नंदी समोर असलेल्या महादेवाच्या पिंडीची.


तुझ्या पायांखालीच माझं स्वर्गाचं दालन,

तुझ्या हसण्यात दडलेलं माझं प्रत्येक यशाचं कारण.

देव सापडला नाही कुठे, शोधत फिरलो या जगामध्ये,

देवही हसला त्या क्षणी, म्हणाला मी तर आहे तुझ्या आईच्या हास्यामध्ये.


सुजित म्हणे, आई तूच माझी भक्ती, तुझ्याच ठायी माझी मुक्ती !!!

Post a Comment

0 Comments